फेसबुकचे न्यूजवायर

पत्रकार आणि न्यूजरूममधील लोकांना अतिशय उपयुक्त ठरू शकेल आणि बातम्यांची खातरजमा, फोटो, व्हिडीओ आणि ताज्या घडामोडी एका क्लिकवर समजू शकतील असे न्यूजवायर पेज सोशल मिडीया साईट फेसबुकने सुरू केले आहे.न्यूज व ग्लोब मिडीयाचे संचालक अन्डी मिशेल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

फेसबुक नियमितपणे पाहणार्‍या युजरची संख्या अब्जांमध्ये आहे. त्यामुळे येथेच दररोज बातम्याही उपलब्ध झाल्या तर पत्रकार आणि या क्षेत्रातील मंडळींना मोठाच हातभार लागणार आहे त्याचबरोबर फेसबुकच्या युजरबरोबर फोटो, व्हीडीओ तसेच बातम्यांच्या घडामोठी शेअर करताही येणार आहेत. न्यूजवायरच्या माध्यमातून पत्रकारांना जगभरातून वैयक्तीक रित्या दिल्या गेलेल्या तसेच संस्थांतर्फे दिल्या गेलेल्या बातम्या, मूळ फोटो मिळू शकणार आहेत. चळवळी, आंदोलने, निवडणुका आणि क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment