जिओ न्यूजचे प्रसारण बंद

इस्मामाबाद – पाकिस्तानातील प्रसिद्ध टिव्ही चॅनल जिओ न्यूजला कारणे दाखवा नोटिस बजावल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक भागात या चॅनलचे प्रसारण बंद केले असल्याचे वृत्त आहे. केबल ऑपरेटर असो. ऑफ पाकिस्तानचे महासचिव शेख एजाज यांनी रावळपिडी, इस्लामाबाद, कोहाट, हासन अब्देल, पेशावरसह अनेक भागात हे प्रक्षेपण बंद केले गेल्याचे सांगितले आहे.

या चॅनेलचे संपादक व वरीष्ठ पत्रकार हामीद मीर यांच्यावर आठ दिवसांपूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्यात पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचे वृत्त या चॅनलवरून दिले गेल्यानंतर पाक रक्षा मंत्रालयाने हा आयएसआयच्या बदनामीचा प्रकार असून त्यासंदर्भात कारणे दाखवा नोटिस चॅनलला बजावली होती. त्याचे उत्तर ६ मेपूर्वी द्यायचे आहे मात्र त्या अगोदरच  चॅनलचे प्रसारण बंद केले गेले आहे.
अर्थात पाकिस्तान इलेक्ट्रोनिक मिडीया रेग्युलेटरी अॅथॉरिटीने तसे अधिकृत आदेश दिलेले नाहीत असेही सांगितले जात आहे.