सेलफोन अथवा टॅब्लेटच्या कॅमर्यावर सहज चिकटू शकणारे लेन्स संशोधकांनी विकसित केले असून त्यामुळे आपल्या फोनचा वापर युजरला मायक्रोस्कोपसारखाही करता येणार आहे. आयफोन अँड्राईडवरही हे लेन्स सहज बसू शकते. काचेसारखे दिसणारे पण अगदी सॉफ्ट अशा या लेन्सवर स्क्रॅचेस येत नाहीत तसेच ते कुठेही नेता येते. घाण झाले तर साबणाने धुताही येते.
थॉमस लार्सन यांनी २०१२ मध्ये या लेन्सवर काम सुरू केले होते. मोबाईल हँडसेटचा वापर मायक्रोस्कोपसारखा करता यावा यासाठी त्यांनी हे लेन्स विकसित केले असून त्यामुळे १५ मॅग्निफिकेशन क्षमता झूमिंग बरोबर ६० पटीने वाढू शकते. अर्थात त्यासाठी सेलफोनला किमान ५ मेगापिक्सलचा कॅमेरा असणे आवश्यक आहे. मात्र यामुळे रक्तातील पांढर्या पेशी, लाल पेशी, बॅक्टेरियल संसर्गही तपासून पाहता येतात असा लार्सन यांचा दावा आहे. डॉक्टर लोकांना या लेन्सचा वापर फारच उपयुक्त ठरू शकणार आहे.