येस वुई कॅन ठरला ओबामांच्या विजयाचा नारा

निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पक्षांकडून विविध नारे दिले जातात आणि निवडणुका आणि हे नारे किवा घोषणा यांचा दाट संबंध असतो. कारण हे नारेच मतदारांना संबंधित पक्षाबद्दल पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडतात असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. अमेरिकेचे पहिले ब्लॅक राष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान मिळविलेले बराक ओबामा यांनी दिलेला – येस वुई कॅन – हा नाराच त्यांना राष्ट्राध्यक्ष बनविण्यास मदतगार ठरला होता.

२००९ मध्ये जेव्हा ओबामा ही निवडणुक लढवित होते तेव्हा अफगाणिस्तान आणि इराकबरोबरच्या युद्धामुळे अमेरिकेची परिस्थिती वाईट झाली होती तसेच मंदीनेही अमेरिकेला घेरले होते. त्यात ओबामांचा येस वुई कॅन नारा अमेरिकनांचा आत्मविश्वास वाढविण्यास कारणीभूत ठरला होता.

भारतात सध्या अबकी बार मोदी सरकार हा नारा जोरात असून त्याची सुरवातीला खूप टिंगलही केली गेली. मात्र काँग्रेसनेही या नार्‍याची दखल घेताना आपला काँग्रेसचा हाथ आम आदमीके साथ हा नारा बदलून हर हाथ शक्ती, हर हात तरक्की हा नारा स्वीकारला तेव्हाच अब की बार मोदी सरकारची गंभीर दखल पक्षाने घेतल्याचे सिद्ध झाले असे जाणकार सांगतात. इंदिराजींनीही गरीबी हटाव घोषणेने तर लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान या नार्‍यांची निवड करून निवडणूक सोपी करून घेतली होती.

२००१ साली वर्ल्ड ट्रेट सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा राष्ट्राध्यक्ष असलेले जाजॅ बुश यांनी वॉर अगेन्स्ट टेरर, ए सेफर वर्ल्ड हे नारे देऊन दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदावर वर्णी लावण्यात यश मिळविले होते. इराणचे ८ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेले राष्ट्रपती हसर रूहानी यांनीही विवेक और आशाही सरकार हा नारा दिला आणि इराणी जनतेच्या मनावर कब्जा मिळविला.