९५ व्या मजल्यावर जा ४३ सेकंदात

आत्तापर्यंत आपण वेगाची कमाल मर्यादा गाठणार्‍या कार, बाईक आणि ट्रेन संबंधी वाचले असेल. पण हिताची कंपनीने चीनच्या ग्यांगझू भागात उभारल्या जात असलेल्या गगनचुंबी इमारतीत जगातील सर्वाधिक वेगवान लिफ्ट बसविण्याचे काम हाती घेतले आहे. अर्थात ही सीटीएफ फायनान्शियल सेंटरची इमारत २०१६ मध्ये पूर्ण होणार आहे. ९५ मजल्याच्या या इमारतीत ताशी ७२ किमीच्या वेगाने जाणारी लिफ्ट बसविली जाणार आहे. यामुळे पहिल्या मजल्यापासून ते ९५ मजल्यापर्यंतचे अंतर केवळ ४३ सेकंदात जाता येणार आहे.

सध्या तैवानच्या ताईपेई १०१ इमारतीत बसविली गेलेली लिफ्ट जगातील सर्वात वेगवान लिफ्ट असून तिचा वेग आहे ताशी ६०.६ किमी. चीनमधल्या इमारतीत बसविल्या जात असलेल्या वेगवान लिफ्टमधील प्रवास आरामदायी व्हावा आणि अतिवेगामुळे लोकांचे कान बंद होण्यापासून म्हणजेच कानात दडे बसण्यापासून बचाव व्हावा म्हणून यात कृत्रिम पद्धतीने हवेचा दाब नियंत्रित केला जाणार आहे.

Leave a Comment