
मुंबई – भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण केले. मात्र वाढदिवसाच्या दिवशीच मतदान असल्याने सचिनने मतदानाचा हक्क बजावायला प्रथम प्राधान्य दिले. त्यासाठी तो दुबईतून थेट मुंबईला आला . सचिनने पत्नी अंजलीसोबत जाऊन घराजवळच्या मतदान केंद्रात मतदान केले.