व्हॉटसअॅप युजर संख्या गेली ५० कोटींवर

मोबाईल मेसेजिंग सेवा देणार्‍या व्हॉटस अॅपच्या युजरनी ५० कोटींचा टप्पा गाठला आहे. कंपनीला युजर कडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कंपनीचे सीईओ जॅन कॉम यांनी युजरचे आभार मानले आहेत. जगात आता व्हॉटसअॅपचे ५० कोटी रेग्युलर युजर झाले आहेत.

गेल्या काही महिन्यात कंपनीची युजर संख्या वेगाने वाढत असून ब्राझील, भारत, मेक्सिको, रशियात युजरचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून कॉम म्हणाले की दरदिवशी युजर ७० कोटी फोटो आणि १० कोटी व्हिडीओ शेअर करत आहेत. ऑगस्ट २०१३ मध्ये व्हॉटस्अॅप युजरची संख्या २० कोटी होती. अवघ्या १ वर्षात त्यात ३० कोटींची भर पडली आहे.

व्हॉटसअॅप ही एसएमएस साठी खर्च न येता मेसेज देवाणघेवाण करण्याची सुविधा युजरला देणारी कंपनी आहे आणि नुकतीच ही कंपनी फेसबुकने विकत घेतली आहे.

Leave a Comment