मुंबईत बलात्कार सत्र सुरूच 

मुंबई  – वडाळा रेल्वे स्थानक येथे ओळखीच्या तरूणीवर बलात्कार करणार्‍या ईश्‍वर केसघोडम (३0) याला माटुंगा पोलिसांनी अटक केली.

वडाळा परिसरात राहणारी ही २0 वर्षीय तरुणी १८ एप्रिलला तिच्या एका नातेवाईकाकडे गेली होती. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ती वडाळा रेल्वे स्थानकात उतरली. यावेळी तिचा एक मित्र तिला रेल्वे स्थानकाजवळ भेटला. तो तिला मोटारसायकलवरुन घरी घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचे गाडीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्या तरुणीला रस्त्यातच सोडून तो पेट्रोल घेण्यासाठी गेला. याच दरम्यान तिला ओळखीचा आरोपी भेटला. ती त्याच्यासोबतच चालत घराकडे निघाली. मात्र एका निर्जन ठिकाणी आरोपीने तिच्यासोबत अलि चाळे करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध करताच त्याने तिला जबर मारहाण करून बलात्कार केला आणि पळ काढला. काही पादचार्‍यांनी त्या तरुणीला सायन रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी या तरुणीने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

वांद्रेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

खाऊचे आमिष दाखवून वांद्रे येथे एका बारावर्षीय अल्पवयीन मुलीवर मानसिंग राजभर (२१) या आरोपीने बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी आज सकाळी आरोपीला अटक केली.

वांद्रे शासकीय वसाहत परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याच इमारतीमध्ये पीडित मुलगी आई-वडिलांसोबत राहते. आरोपी आणि पीडित मुलीचे आई-वडील याच ठिकाणी

मजुरीचे काम करतात. मंगळवारी सायंकाळी मुलगी बाहेर खेळत असताना आरोपीने तिला खाऊचे आमिष दाखवून इमारतीच्या चौथ्या मजल्यावर नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. घरी परतल्यानंतर तिने हा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली