सौदीत १ किमी उंचीची इमारत

दुबईतील बुर्ज खलिफा ही सध्या जगातील सर्वात मोठी व उंच इमारत म्हणून नोंदली गेली असताना आता दुबईचे शेजारी राष्ट्र सौदी अरेबियात तब्बल १ किमी उंचीची म्हणजे ३२८० फूट उंचीची अतिभव्य इमारत उभारली जात आहे. या इमारतीचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. अर्थात ही इमारत बांधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे अॅडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेकनॉलॉजी सव्र्हिसेसचे अभियंते सांगतात.

या इमारतीसाठी येणारा खर्च १.२३ अब्ज डॉलर्स इतका असून ती २०० मजले असेल. समुद्र किनार्‍यालगतच ती उभी केली जाणार आहे. मात्र समुद्राकाठी बांधकाम करणे अवघड असते आणि त्यावेळी खारे पाणी, वेगवान वारे यांचाही विचार करावा लागतो. त्या दृष्टीने अनेक प्रकारच्या कॉक्रीट चाचण्या घेतल्या जात आहेत. इमारतीच्या प्रत्येक मजल्याचा आकार वेगळा ठेवला जाणार असून वार्यायच्या दिशेप्रमाणे हे आकार बदलत राहतील असे समजते.