गतवर्षीच स्थापन झालेल्या चीनमधील वन प्लस फोन कंपनीने पहिला अॅड्राईड फोन वन प्लस वन नावाने बाजारात आणला असून त्याची किंमत आहे अवघी २९९ डॉलर्स. उत्तम डिझाईन, पॉवरफुल हार्डवेअर मुळे हा फोन अॅपलच्या आयफोन ५एस आणि सॅमसंगच्या गॅलेक्सी ५एस ला तगडी टक्कर देईल असा तज्ञांचा अंदाज आहे.
ऑपोच्या उपाध्यक्षपदी काम केलेले पेटे ल्यू वन प्लस कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने परवडणार्या किमतीत उच्च दर्जाचे हायएंड स्मार्टफोन देण्यासाठी प्रयत्न चालविले असून क्वालकॉम शी हार्डवेअरसाठी सहकार्य करार केला आहे. वन प्लस वन युजरला फ्रेश अनुभव देईल असा त्यांचा दावा आहे. या फोनसाठी स्नॅपड्रॅगन ८०१, ५.५ इंची स्क्रीन, १३ मेगापिक्सलचा कॅमेरा व ५ एमपीचा फ्रंट कॅमरा, अँड्राईड ४.४ कस्टमाईज ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली असून फोनचे वजन आहे १६२ ग्रॅम. १६ जीबी आणि ६४ जीबी मध्ये हे फोन उपलब्ध आहेत.
मे महिन्यात ऑस्ट्रीया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड फ्रान्स, जर्मनी, र्हांगकाँग, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल,स्पेन, स्वीडन, तैवान, यूके आणि यूएस मध्ये हे फोन बाजारात येत आहेत. सिल्वर व्हाईट कलरमध्ये १६ जीबीसाठी त्यांची किमत २६९ व २९९ डॉलर्स तर ६४ जीबीसाठी ब्लॅक कलरमध्ये त्यांची किमत ३४९ व २९९ डॉलर्स अशी आहे. आयफोन ५एस व गॅलेक्सी ५ एस च्या किंमती ६०० डॉलर्सपर्यत असल्याने या दोन फोनना वन प्लस वनशी तगडी स्पर्धा करावी लागेल असा तज्ञांचा अंदाज आहे.