लसिथ मलिंगा श्रीलंकेचा कर्णधार

कोलंबो- नुकताच ढाका येथे पार पडलेल्या टी-२०च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला नमवून लसिथ मलिंगाच्या नेतत्वाखाली श्रीलंकेने बाजी मारली. त्यामुळेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कर्णधरपदावरून दिनेश चंडिमलला वगळून लसिथ मलिंगा याच्याकडे कर्णधारपद सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आगामी काळात मलिंगाची कॅप्टानशिप कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या टी २० विश्वचषकात श्रीलंकेला जेतेपद पटकावून दिल्याने मलिंगाला त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे. तर लहिरू थिरीमानेला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे मलिंगावर मोठी जबाबदारी सोपविण्यारत आली आहे. सध्या मलिंगा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स‍कडून खेळत आहे.

ढाका येथे काही दिवसापूर्वीच पार पडलेल्या टी-२०च्या विश्वचषक स्पर्धेत चंडिमलच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ खेळत होता, पण अखेरच्या तीन सामन्यांसाठी संघात मोठे फेरबदल करण्यात आले. अचानक चंडिमलला वगळून मलिंगाकडे कर्णधार पद सोपविण्यात आले. त्या‍चा फायदा श्रीलंकेला झाला व त्यामुळे विश्वचषक जिंकता आला.

Leave a Comment