पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू

मुंबई  – बोरिवली कारागृहात हत्येच्या गुह्याखाली अटक केलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला. मृत पावलेल्या आरोपीचे नाव आकाश खराडे उर्फ आकु (22) असून सदर प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 11 कडे सोपविण्यात आला आहे.

आकाशला समतानगर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अटक केली होती. त्यानुसार त्याला बोरिवली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी ठोठावली होती. या प्रकरणात समतानगर पोलिसांनी आकाशची वैद्यकीय चाचणी करून त्याची रवानगी बोरीवली कारागृहात केली. मात्र, मंगळवारी सकाळी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. खराडे सकाळी उठल्यानंतर स्वच्छतागृहात अचानक पाय घसरून पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, यामध्ये सत्य काय याचा तपास सुरू आहे.

Leave a Comment