टॉयलेटच्या फ्लशपासून वीज निर्मिती

सर्व जगातच वीजेची टंचाई जाणवत असताना घरच्याघरी वीज मिर्मिती करून या संकटातून सुटका करून घेण्यासाठीचे तंत्रज्ञान कोरियातील संशोधकांनी विकसित केले आहे. त्यानुसार घरात पाण्याचा जो वापर होतो त्यापासून वीज मिर्मिती करता येणार आहे. अगदी टॉयलेटचा फ्लश सोडला तरी त्यापासूनचही वीज निर्माण करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पावसाळ्यात खिडक्यात टपकणारे पाणी, बेसीनमध्ये , टॉयलेटमध्ये अथवा किचनमध्ये वापरले जाणारे वाहते पाणी त्यासाठी उपयुक्त आहे. सोल राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधक यॉन सेंग किम आणि कोरिया इलेक्ट्रोनिक टेकनॉलॉजी संस्थेतील सहकार्‍यांनी सहयोगाने एक असे उपकरण तयार केले आहे की जे वाहत्या पाण्यापासून वीज निर्मिती करू शकते. पाण्याची कोणत्याही हालचालीतून निर्माण होणारी यांत्रिक उर्जा वीजेत रूपांतरीत करण्याचे काम हे उपकरण करते. पाऊस, नदीचे वाहते पाणी, समुद्राच्या लाटा अशा नैसर्गिक  प्रवाहांपासूनही वीजनिर्मिती करता येतेच पण घरच्याघरी नागरिक वाया जाणार्‍या पाण्यापासून वीज निर्मिती करून घरात वापरासाठीची वीज या उपकरणाच्या वापराने मिळवू शकतील असा संशोधकांचा दावा आहे.

Leave a Comment