मुंबई – राज्यातील १९ लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यातील ११७ मतदारसंघात मतदान होणार आहे.राज्यात तिस-या आणि अंतिम टप्प्यात मुंबईतील सहा, ठाणे जिल्ह्यातील चार यासह रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी आणि नाशिक या मतदारसंघात दि २४ रोजी मतदान होणार आहे.
तिस-या टप्प्या १९ मतदारसंघातून ३३८ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी १४९ उमेदवार अपक्ष निवडणुक लढवत आहेत. तर २६ महिला उमेदवार आहेत.या टप्प्यातील १९ मतदारसंघात तीन कोटी १७ लाख ३९ हजार ४४२ मतदार आहेत. त्यापैकी एक कोटी ७० लाख २० हजार ३८३ पुरुष तर एक कोटी ४६ लाख २२ हजार ७१३ महिला मतदार आहेत.
या १९ मतदारसंघापैकी १२ ठिकाणी १६ पेक्षा अधिक उमेदवार आहेत. सर्वाधिक २७ उमेदवार औरंगाबाद मतदारसंघात आहेत. तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी नऊ उमेदवार रिंगणात आहेत.या टप्प्यात भाजपचे अकरा, शिवसेनेचे आठ, काँग्रेसचे दहा, राष्ट्रवादीचे आठ, मनसेचे सात आणि सीपीआयचे दोन, सीपीएमचे तीन आणि बसपचे १९ उमेदवार आहेत.