नाशिक – पुण्यापाठोपाठ मुंबई व अन्य शहरासह आता नाशिकमध्येही मतदारयाद्यांमधील घोळ चव्हाट्यावर आला आहे,त्यामुळे मतदार वैतागलेले असतानाच भाजपनेही राज्यात ७४ लाख मतदार हे मतदार याद्यातून ‘गायब’ असल्याची तक्रार केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ८० हजार मतदारांची नावे मतदार याद्यांतून वगळण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. लोकसभा निवडणूकीसाठी पुण्यातही मतदार याद्यांतून मतदारांची नावे वगळण्याची घटना घडलेली असताना त्याच धर्तीवर मुंबई त्यापाठोपाठ नाशिकमध्ये मतदार यादीतील या घोळामुळे त्रासलेल्या मतदारांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे.यापूर्वीच महाराष्ट्रातील जवळपास ७४ लाख मतदारांची नावे मतदार याद्यांतून वगळण्यात आल्याची तक्रार भाजपने केली आहे.