दाभोळकर सरांचे मारेकरी सापडतील ही अंधश्रद्धा नाही !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि या चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आठ महिने उलटले तरी पोलिस मारेक-यांच्यापर्यंत तर सोडाच पण त्यांच्या दिशेने पावलेही टाकताना दिसत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं उभं राहिले आहे. कारण जो पर्यंत पोलिसांची विश्वासार्हता होती तोपर्यंत पोलिसांचा ह्यूमन इंटेलिजन्स चांगला होता, म्हणूनच दाभोळकर सरांचे मारेकरी सापडतील ही अंधश्रद्धा नाही.

समुद्रमार्गे दहशतावादी मुंबईत येऊन गोळीबार करायला लागल्यावर मुंबई पोलिसांन कळले की दहशतवादी आले आहेत म्हणून. कारण त्यांच्याकडे अशी कोणतिही महितीच नव्हती. अशी महिती देतं कोण तर कोणीही सर्वसामान्य व्यक्ती अशी संशयास्पद हलचालींची महिती पोलिसांना देते किंवा पूर्वी पोलिसांचे स्वताचे खब-यांचे जाळे होते. ते जाळंही फटलं असल्यानेच गोळीबार आवाजाने पोलिस जागे झाले.

या घटनेला आठ वर्षे झाली तेव्हापासून पोलिस दलाचा गुप्तचर विभाग या विषयावर काथ्याकूट सुरू आहे. त्यानंतर हा विभाग स्वतंत्र केला. स्वतंत्र अकादमी केली यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले अधिकारी जेव्हा महाराष्ट्रभर पसरतील तेव्हाच त्याचे परिणाम काही दिसतील. पण तोपर्यंत घटना तर घडायच्या थांबत नाहीत. कोणत्याही घटनेचा छडा हा छोट्यातील छोट्या महितीपासून लागतो. त्यामहितीची योग्य दखल घेण्याची मानसिकता असलेले अधिकारी असणे गरजेचे आहे. तसे पोलिस दलात किती अधिकारी आज आहेत ?

पोलिसांकडे कोणतिही अदभूत शक्ती किंवा सिद्धी नाही की ज्यायोगे ते बसल्याजागी अशी घटनांचा छडा लावू  शकतात. पण त्यांचे डोळे आणि कान असणारे त्यांचे खबरे राहिलेले नाहीत आणि कोणीही आमआदमी पोलिसांचे डोळे – कान होण्यास तयार नाही. कारण हे पोलिस आपल्यालाच यात लटकवणार नाहीत कशावरून अशी भिती त्याला वाटली तर त्यात त्याची काहीच चूक नाही.

मारेक-यांबद्दलची महिती असो वा दहशतवाद्यांबद्दलची आपला विश्वासू साथीदार आपल्याला काय महिती देत आहे हे समजून घेऊन त्यावर कृती करण्याची धमक असलेले पोलिस दलात आज किती जण आहेत हा संशोधनाचाच विषय आहे. सिनेमात दाखवतात की मतदारांसारखेच पोलिसदलही विविध राजकीय पक्षांमध्ये, गुंडांच्या टोळ्यांमध्ये विभागले गेले आहे हे काही सगळंच खोट नसते. त्यालाही कुठेतरी सत्याची किनार असतेच. ती कुठे मोठी असते तर कुठे धाग्या इतकी असते.

कोणत्याही घटनेचा छ़डा लावण्यासाठी ह्यूमन इंटेलिजन्स हा सर्वात महत्वाचा आहे. त्याला जगात सगळ्या देशात महत्व आहे. पण आपल्याकडेच ह्यूमन इंटेलिजन्सला फारसे महत्व देताना पोलिस दिसत नाहीत. कारण ह्यूमन इंटेलिजन्स म्हणजेच विश्वासार्हता. पोलिसांवर खब-याचा म्हणा किवा आमआदमीचा म्हणा विश्वास बसला तरच त्यांच्यापर्यंत कोणतिही महिती सहजपणे पोचू शकते. असे पूर्वी अनेकदा घडले आहे. पण आज दुर्दैवाने हे घडताना दिसत नाही, कारण पोलिसांना त्यांची विश्वासार्हता महत्वाची वाटतच नाही. म्हणूनच मुंबईत गोळीबारात माणसे मरायला लागल्यावर पोलिस जागे होतात, सकाळी दाभोळकरांची हत्या रस्त्यात होऊनही मारेक-यांचा अंदाज पोलिसांना येत नाही.

पोलिसाना जर सामान्य चोरापासून ते दहशतवाद्यांपर्यंतची महिती देणारे स्त्रोत तेच आहेत आणि त्यांचा सवालही एकच आहे तो म्हणजे विश्वासार्हता ! ही विश्वासार्हता पोलिस जोपर्यंत मिळवत नाहीत तोपर्यंत ते टीकेचे धनीच ठरणार.

 

Leave a Comment