मुंडेंची कबुली ;राजकडे पाठींबा मागितला,सेना संभ्रमात !

बीड –  राजकीय आखाड्यात विशेषत;शिवसेनेच्या गोटात आणखी खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंशी झालेली भेट सेनेच्या जिव्हारी लागल्यानंतर आता भाजपचे दुसरे नेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकडे पाठींबा मागितल्याची कबुलीच देवून टाकल्याने सेनेची आगामी काळातील अडचण पुन्हा वाढली आहे. 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच बीड मधील महायुतीचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांना आपला पाठींबा जाहीर केला. तसे पत्रही राज ठाकरे यांनी मुंडे यांना पाठवले होते. तसेच बीडमधील सर्व मनसे कार्यकर्त्यांनी त्यांनी  मुंडेंना पाठींबा देण्याचे आवाहन केले होते.या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आणि  भाजप- मनसेचे आगामी राजकीय गणित काय ?यावरच चर्चेचे गुऱ्हाळ रंगले होते मात्र   मुंडे यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच सेना नेतृत्वाने देखील यावर मौन बाळगले  होते. परंतु आता मुंडे यांनीच स्वत: राज ठाकरे यांना फोन केल्याची कबुली दिली.

 बीडमध्ये मनसेने आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी आपण राज ठाकरेंना फोन केल्याचे मुंडे यांनी सांगीतले.मनसेने बीडमध्ये आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी स्वत: गोपीनाथ मुंडें यांनी मला वारंवार फोन केला, त्यामुळे त्यांना मी लेखी पाठिंबा देत असल्याचे जाहीर वक्तव्य राज ठाकरे यांनी  मुंबईतील एका सभेत केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. 

दरम्यान, त्यांच्या या कबूलीमुळे महायुतीत मात्र अस्वस्थता पसरली आहे. कारण, पाठींब्यासाठी राज ठाकरे यांनी भाजप पक्षाला अथवा महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाला याची कल्पना दिली नव्हती अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

 

Leave a Comment