महायुतीच्या सभेला गडकरी यांची दांडी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सुरू असलेली गटबाजी निवडणूकीचा टप्पा दोन दिवसांवर येवून ठेपला तरी संपण्यायची शक्यता दिसत नाही. सोमवारी मुंबईत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महासुतीची सभा पार पडली. य सभेला शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडवणीस उपस्थित होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे मात्र सभेला गैरहजर होते. त्यामुळे सध्या उलट-सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे.

ब-याच दिवसांपासून सुरू असलेल्या् मुंडे-गडकरी वादाचा फटका महायुतीला बसला असल्याचे बोलले जात आहे. या दोघांतील हा वाद सध्या तरी मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेतही त्याचा प्रत्यय आला. या सभेला गडकरी येतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचे राज ठाकरेंबरोबरचे सख्य पाहता त्यांना या सभेला उपस्थित राहण्यापासून रोखण्यात आले असल्याचे समजते.

या सभेच्या निमित्ताने महायुतीत सर्व काही ठीक आहे हे दाखवण्याचा त्यांच्याकडून केविलवाणा प्रयत्न केला गेला. मात्र उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गडकरींचीच चर्चा होती. या सभेच्या माध्यमातून मोदींच्या उपस्थितीत गडकरी, मुंडे, ठाकरे एकत्र येतील कार्यकर्त्यांची अशी अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे निवडणुकीआधीच कार्यकर्त्यांचाही भ्रमनिरास झाला. या दोघांच्या गटबजीचा महायुतीच्या मतावर परिणाम होवू नये याची चर्चा आहे.

Leave a Comment