सांगलीची नावे + पेडन्यूज + पैसे वाटप — (विश्व)जीत

लोकसभेच्या या निवडणुकीत पुण्यातील काँग्रसच्या उमेदवाराने काय काय केले नाही सगळे केले. सांगलीतील लाखभर नावे घातली, पेड न्यूज दिल्या आणि पैसेही वाटले. एवढं केल्यावर सुशिक्षित पुण्याचा उच्चशिक्षित उमेदवार विश्वजीत कदम जिंकले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण हे तिन्ही मार्ग कोण हाताळतो जो जिंकण्याच्या अवस्थेत नसतो तोच.

पुण्यातून काँग्रेसकडून भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम हे इच्छुक आहेत ही बातमी अनेकांन आश्चर्याचा धक्का देऊन गेली. पण त्याचवेळी मतदार यादी अपडेट करण्याचे काम सुरू असताना सांगली जिल्ह्यातील एक लाख आठ हजार नावे पुण्याच्या मतदार यादीत घालण्याचा कार्यक्रम सुरू होता ही बाब निवडणूक प्रचार सुरू झाल्यावर उघड झाली.

त्यानंतर बातम्यांसाठी शहरातील खपाचा दावा करणारी आणि पुणेकरांचे, महाराष्ट्राचा जनमत तयार करणाच्या दावा करणारी काही वृत्तपत्रे मात्र बातम्या व्टीस्ट करून देत होते हे प्रकार लक्षात येण्यासारखेच होते. पण अचानक अशा बातम्या बंद होऊन उमेदवारांचे गुणगान सुरू झाले. हा बदल एका रात्रीत झाला. हे लक्षात आल्यानेच डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर पेडन्यूजचा गुन्हा दाखल झाला.

निवडणुकीचा जाहीर प्रचार संपत असतानाच भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य आणि दोन जणांना पैसे वाटताना रंगे हाथ पक़डण्यात आले. त्यांच्याकडे पैशाची पाकिटे होती. या प्रकरणातही अखेर विश्वजीत कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

भारती विद्यापीठ हे पुण्यात गेली अनेक वर्षे आहे. त्यात पतंगराव कदम हे वरचेवर पुण्यात कार्यक्रमासाठी येत असतात. त्यांचे निवासस्थान पुण्यात असले तरी मतदार यादीत नावे मात्र पसूलला आहेत. आजपर्यत त्यांनी पुण्यासाठी काय केले हे कधीच सांगितले नाही. त्यात विश्वजीत कदम हे गेली चार वर्षे युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रचारात सांगत होते की, मी पुण्याच्या समाजकारणात, सांस्कृतिक कामात योगदान दिले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आय़ोजन केले आहे. पण कोणते कार्यक्रम त्यांनी केले हे कधीच सांगितले नाही कारण केलेलेच नाहीत. त्यांनी फक्त फूटबॉल चे सामने सेलेब्रटींना बोलवून भरवले हेच काय ते त्यांचे पुण्यासाठीचे योगदान.

ते पुणे जिल्हा फूटबॉल संघटनेचे अध्यक्षही आहेत. या व्यतिरिक्त त्यांचे योगदान काहीच नाही.  निवडणुकीत जिंकण्याची हमी ज्या उमेदवरांना नसते ते असे काही प्रकार हाताळतात. पण काँग्रेसचे तिकीट असूनही आणि पुण्याची जागा काँग्रेसची असूनही कदम यानी एकही प्रकार हाताळयाचा सोडला नाही हेच यावरून सिद्ध होते. त्यामुळे या उच्चशिक्षित उमेदवाराने पुण्याच्या लौकीकात भर टाकण्याऐवजी पुण्याचे नाव घालवले आहे.

 

Leave a Comment