चेन्नईसमोर दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान

अबुधाबी – आयपीएल-७ मध्ये माजी विजेता असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला मोठे लक्ष्य उभे करूनही पहिल्यास सामन्यात पंजाबकडून पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने आगामी काळात होत असलेल्या लढतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. सोमवारी चेन्नई सुपर किंग्जची लढत दिल्ली डेअरडेव्हिल्स सोबत होणार आहे. या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दिल्ली डेअरडेव्हिल्सने पहिल्या सामन्यात कोलकात्यावर मात केली आहे. त्यामुळे आगामी काळात दिल्ली संघ सातत्य राखण्यास उत्सुक आहे. या लढतीद्वारे ढोणी आणि दिनेश कार्तिक आमनेसामने येणार आहेत. पहिल्या लढतीत २०५ धावा करूनही दोन वेळचा विजेता चेन्नईला किंग्ज इलेवन पंजाबने हरवले. फलंदाजी चांगली झाली तरी चेन्नईला गोलंदाजीत सुधारणा आवश्यक आहे.

ड्वायेन स्मिथ आणि ब्रेंडन मॅककलमचा फॉर्म चेन्नईसाठी जमेची बाजू आहे. सुरेश रैनासह कर्णधार महेंद्रसिंग ढोणी, फाफ डु प्लेसिस आणि रवींद्र जडेजामुळे त्यांच्या फलंदाजीत ‘डेप्थ’ आहे.
दुसरीकडे चेन्नईच्या गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले. सलामीच्या लढतीत ग्लेन मॅक्सवेलने मध्यमगती आशिष नेहरा वगळता सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दिल्लीची फलंदाजीही मजबूत आहे. त्यामुळे कर्णधार ढोणीला गोलंदाजीत वेगळे डावपेच राबवावे लागतील.

ऑफस्पिनर आर. अश्विनसह आशिष नेहरा, मोहित शर्मा आणि रवींद्र जडेजावर त्यांची गोलंदाजीची भिस्त आहे. मात्र दिल्लीची फलंदाजी मजबूत असल्याने या सर्वाची मोठी परीक्षा राहील. त्याभमुळे या सामन्या त दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी कशी राहणार यावर जय-पराजय अवलंबून राहणार आहे.

Leave a Comment