उन्हामुळे मोदींच्या सभेला गर्दी कमी

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील सभेला रेकार्डब्रेक गर्दी होत आहे. प्रत्येक सभेगणीक गर्दी वाढतच असल्याने रविवारी झालेल्या मोदी यांच्या सभेला दोन लाख पेक्षा अधिक नागरिक गर्दी करतील असा कयास होता. मात्र तापमानवाढीचा व उन्हाचा फटका बसल्याने सव्वा लाखांच्या जवळपास नागरिक सभेसाठी उपस्थित असल्याचा अंदाज पोलिसांसह गुप्तचर यंत्रणांने व्यक्त केला आहे.

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अहमदनगर या ठिकाणावरून दोन लाख नागरिक येतील असा आयोजकांचा अंदाज होता. त्यानुसार सभेची तयारी करण्यात आली होती. मात्र भर दुपारी सभा असल्याने त्याचा काही प्रमाणात उपस्थितीवर परिणाम झाला. त्यामुळे काही प्रमाणात याठिकाणी गर्दी कमी झाली होती.
जळगाव येथील सभेच्याम ठिेकाणी दुपारी तीन वाजेर्पयत सभेच्या ठिकाणी तुरळक गर्दी दिसत होती. मात्र चार वाजेपासून कार्यकर्त्यायचे लोंढेच्या लोंढे सभेच्या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्षात सभा सुरु होईस्तोवर पोलिसांना देखील नेमके किती लोक आले आहेत याचा अंदाज आलेला नव्हता. त्यातच बहुतांश कार्यकर्ते हे ठिकठिकाणी विखुरले होते. काही कार्यकर्ते टी.व्ही कार्यकर्ते डाव्या बाजूला असलेल्या झुडपांचा आधार घेत दाटीवाटी करून बसलेले होते. मोदींचे भाषण आटोपल्यानंतर नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडायला सुरुवात केली.

यावेळी पोलिसांनी किमान सव्वा लाख लोक सभेसाठी उपस्थित असल्याचा आपला अंदाज बांधला. गुप्तचर यंत्रणांनी देखील त्या आशयाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. जिल्हा विशेष शाखेने देखील सभेसाठी आलेल्या नागरिकांच्या संख्येचा अंदाज वरिष्ठांना कळविला आहे. या सभेला गर्दी कमी झाल्याने काही अंशी आघाडीच्या नेत्यांना दिलासा लाभला आहे. मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने येत्या दोन दिवसात प्रचार सभांचा माहोल रंगणार आहे.