सॅटेलाईट रडार देणार ज्वालामुखी उद्रेकाचा संदेश

जगभरात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे दरवर्षी हजारो लोकांचे स्थलांतर करण्याची वेळ येते. ज्वालामुखीच्या मुखातून धूर व राख बाहेर पडू लागली की उद्रेक होईल अश्या शक्यतेनेच असे स्थलांतर केले जाते. मात्र दरवेळी उद्रेक होतोच असे नाही. यापुढे मात्र ज्वालामुखीचा उद्रेक होणार किंवा नाही याची माहिती उपग्रह रडारवरून शास्त्रज्ञ अचूक सांगू शकणार आहेत.

ज्वालामुखीच्या अंतरंगात काय हालचाली चालू आहेत याची माहिती बाहेरून मिळू शकत नाही. ज्वालामुखीच्या पोटात असलेला मॅग्मा वरच्या बाजूला सरकत असेल तर ज्वालामुखीचा उद्रेक लगेच होतो. सॅटेलाईट रडारच्या सहाय्याने या मॅग्माच्या हालचाली त्वरीत समजू शकतात व त्यामुळे उद्रेक होणार असल्याची सूचना त्वरीत मिळू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे. ब्रिस्टल, कार्नेल, ऑक्सफर्ड आणि सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठातील संशोधकांनी संयुकत संशोधनातून हा शोध लावला आहे.