मनोहर जोशींच्या वक्तव्याला आठवले यांचा दुजोरा

मुंबई: २००९ च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी शिवसेनेसोबत राष्ट्रवादी युती करण्याच्या तयारीत होती अशा प्रकारचे वक्त‍व्य मनोहर जोशी यांनी केले होते. त्यावेळी राष्ट्रवादीकडून त्यांचा विधानाची खिल्ली उडविण्यात आली होती. मात्र आता रिपाइं नेते रामदास आठवले हे मनोहर जोशी यांच्या मदतीला आले असून राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये येण्याचा विचार करीत होता असा दुजोरा रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रावादी कॉग्रेस अडचणीत आली आहे.

ठाणे लोकसभेचे शिवसेना उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले यांनी ऐरोलीमध्ये जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना रिपाईनेते रामदास आठवले म्हरणाले, आगामी काळात जर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये येणार असेल तर आपला त्याेला ठाम विरोध असणार आहे. राज ठाकरेंचा समाचार घेतला. राज ठाकरे यांना मिळणारी दलित मते आपण शिवसेनेकडे वळल्यामुळे राज ठाकरे आपल्याला लक्ष आहेत.

यावेळी आठवले यांच्या सभेसोबतच ऐरोलीत रोड शोचेही आयोजन करण्यात आले होते. या रोड शोला आरपीआय आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीनंतर आठवले यांची सभा आयोजीत करण्याात आली होती सभेला शिवसेना व रिपाईच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने हजेरी लावली.