वार्धक्याशी मुकाबला

चेहर्‍यावर सुरकुत्या पडणे आणि केस पांढरे होणे या गोष्टी कोणाला आवडतात? आपण वृद्ध होऊ नये असेच प्रत्येकाला वाटते. मात्र वार्धक्य हे अटळ आहे. ङ्गार तर आपण वार्धक्याच्या काही खुणा लपवू शकतो. लपवणे म्हणजे कृत्रिम प्रसाधन करून लपवणे नव्हे तर आरोग्याचे रक्षण करून लपवणे. अनेक लोक साठी-सत्तरी गाठली तरी त्यांच्या चेहर्‍यावरून आणि शरीरयष्टी वरून तरी ते वृद्ध झाले आहेत असे वाटत नाही. योग्य तेवढे काम, आवश्यक तेवढी विश्रांती, मिताहार आणि व्यायाम एवढ्या गोष्टी सांभाळल्या तर ते शक्यही होते. यामध्ये आहाराला ङ्गार महत्व आहे. म्हणून काही तज्ज्ञांनी वार्धक्य लांबवण्यासाठी आहार सांगितलेला आहे. आपल्या खाण्यामध्ये काही वस्तू आवर्जून समाविष्ट केल्या तर ते शक्य होते. त्यातील महाराष्ट्रात उपलब्ध होऊ शकतील अशा काही ङ्गळांचा आणि अन्न पदार्थांचा परामर्ष घेणे आवश्यक ठरेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ताज्या, हिरव्या पालेभाज्या. 

आरोग्याच्या रक्षणामध्ये हिरव्या पालेभाज्यांना सर्वात अधिक महत्व आहे. कारण त्यामध्ये जीवनसत्व क आणि कोणत्याही रोगाशी मुकाबला करण्यास उपयुक्त ठरणारे ऍन्टी ऑक्साईडस् विपूल प्रमाणात असतात. माणसाच्या शरीरावर ज्या किरणांचा परिणाम होऊन वार्धक्याच्या खुणा उमटत असतात त्या किरणांचा प्रतिकार करणारी लायकोपीन आणि बिटाकॅरोटिन ही द्रव्ये भाज्यांमध्ये भरपूर असतात आणि हिरव्या पालेभाज्या वजन नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त असतात. ङ्गळांमध्ये टरबूज हे ङ्गळ अतीशय उपयुक्त असते. वैद्यकीय तज्ज्ञ तर टरबुजाचे वर्णन म्हातारपण टाळणारे ङ्गळ अशा शब्दात करत असतात. कारण टरबुजामध्ये शर्करेचे प्रमाण कमी असते आणि सेलेनियम, अ, ब, क आणि ई जीवनसत्व भरपूर असते. विशेषत: झिंकचे प्रमाण चांगले असते. 

काजू, बदाम आणि शेंगदाणे यांच्या खाण्याने शरीरात चरबी वाढते हे खरे, परंतु मर्यादित प्रमाणात या बियांचा आहारात समावेश केल्यास तो अधिक उपयुक्त ठरतो. या बियांना आहार तज्ज्ञ पॉवर हाऊस ऑङ्ग एनर्जी असे संबोधतात. मर्यादित प्रमाणात यांचा वापर केल्यास केवळ वार्धक्याच्या खुणाच टळतात असे नाही तर आळस कमी होतो आणि शरीर सतत ताजेतवाने राहते. सगळ्यात महत्वाचा खाद्य पदार्थ म्हणजे लसूण. निसर्गाने वार्धक्याच्या खुणा परतवून लावण्यासाठी लसणाची निर्मिती केलेली आहे. लसणामुळे शरीरातल्या पेशींचे विघटन आणि जीर्ण होणे या गोष्टी टळतात. लसणामुळे रक्त चांगले राहते आणि रक्तदाब टळतो. त्याचा परिणाम होऊन हृदय विकारापासून सुटका होते. आल्याचा वापरही असाच उपयुक्त ठरतो कारण आले आपल्या शरीरातल्या पचन क्रियेला सुरळीत चालवत असते. सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी. पाण्यामुळे माणसाच्या शरीरातल्या सर्वच चयापचय क्रिया सुरळीत आणि नियमितपणे सुरू राहतात.