राहुल गांधी ‘अवतरले’ , पण शरद पवार ‘भरकटले’

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा नियोजित महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करुन त्या ठिकाणी मुंबईतील सभेसाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना धाडण्यात येणार असल्याचे काँग्रेसने जाहीर करताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेला येण्याचे टाळले.त्यामुळे काही दिवासांपूर्वी शरद पवारांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिला होता त्यावर ते ठाम असल्याचे स्पष्ट झाले. प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आल्यानंतर शरद पवार यांनीही आपले हेलिकॉप्टर नादुरुस्त झाल्याचे निमित्त करुन सभेला येण्याचे टाळले.

काही दिवासांपूर्वी शरद पवारांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे राहुल गांधींबरोबर पवार मंचावर येणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते . पण राहुल गांधी यांच्या बांद्रा कुर्ला कॉप्लेक्सच्या परिसरातल्या आजच्या सभेला दांडी मारत राहुल यांच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षरित्या पवारांनी विरोध दर्शविला.आणि ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दाखवून दिले. शरद पवार हे राजकारणात राहुल यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यामुळे या सभेत कोण शेवटी भाषण करतो? सभेतील मानसन्मान आदी प्रश्न उपस्थित होणार असल्यानेच पवारांनी या सभेकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment