पवार काका-पुतण्यांवर मुंडेंची टीका

जालना –   मतदानासाठी पाणी तोडण्याची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आगामी निवडणुकीत पाणी पाजू असा डोस देतानाच भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही ‘लोकसभेतून राज्यसभेत का पळ काढला ‘अशा शब्दात निशाना साधला. 

जालना येथील भाजप  उमेदवाराच्या  प्रचारासाठी गोपीनाथ मुंडेंनी रविवारी  सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार  टीका केली. निवडणुकीत न लढवणार्‍या उद्धव ठाकरेंवर टीका करणार्‍या शरद पवारांनी आधी त्यांनी लोकसभेतून राज्यसभेत का पळ काढला असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर महायुतीचे  सरकार आले  तर गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे  कर्ज माफ करण्याचे  आश्वासन दिले .मतदानासाठी गोरगरीब जनतेला धमकावणार्‍या अजित पवारांनाच लोकसभा आणि येणार्‍या विधानसभा निवडणुकीत पाणी पाजू  असे मुंडे म्हणाले .

 

Leave a Comment