हिमवादळ सहा नेपाळी शेर्पा मृत्युमुखी,नऊ बेपत्ता

काठमांडू ; माऊंट एव्हरेस्टवर आलेल्या हिमवादळात जगातील सर्वांत उंच शिखराच्या रस्त्याचा काही भाग वाहून गेला असून सहा नेपाळी शेर्पा मृत्युमुखी पडले आहेत.तर नऊ शेर्पा अद्याप बेपत्ता असल्याचे नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाकडून समजते. 
 
सकाळी 6.30 च्या सुमारास आलेल्या भीषण हिमवादळात गिर्यारोहकांसाठी रोप फिक्स करण्यासाठी गेलेले शेर्पा गाईड अडकले त्यात  सहा शेर्पांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण बेपत्ता असून या हिमवादळात अडकलेल्या इतर शेर्पांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 
 
नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाचे अधिकारी क्रिष्णा लामसल म्हणाले, की चार शेर्पांचे मृतदेह बर्फाखाली सापडले आहेत. इतर दोन मृतदेह खणून बाहेर काढले जात आहेत. आणखी नऊ शेर्पा अजून बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Comment