हिंदू मुलींचे पाकिस्तानात होतेय जबरदस्तीने धर्म परिवर्तन

नवी दिल्ली – पाकिस्तानात अल्पसंख्याकांचे जीवन अत्यंत हलाखीचे बनत चालले आहे. तेथे राहणारया हिंदूंना अत्यंत कठिण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मुलींचे अपहरण केले जाते आणि जबरदस्ती त्यांचे धर्म परिवर्तन केले जाते.मूव्हमेंट फॉर पीस अँड सॉलिडेरिटी इन पाकिस्तान (एमएसपी) नुसार मागील वर्षी 700 ख्रिश्चन आणि 300 हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यात आले आहे.

एवढेच नव्हे तर त्यांच्या इच्छेविरूद्ध त्यांचा विवाह मुसलमानांसोबत करण्यात आले आहेत. 12 ते 25 वर्षे वय असणाऱया मुलींचे अपहरण केले जाते, त्यानंतर त्यांना इस्लाम पत्करण्यास भाग पाडले जाते. त्याच्यानंतर त्यांचा कोणासोबत तरी निकाह केला जातो असे एमएसपीने सांगितले.या मुलींनी स्वेच्छेने इस्लाम कबूल केल्याचे दाखविले जाते, यामुळे तिच्या अपहरणकर्त्यांविरूद्ध तक्रार दाखल होत नाही. निकाहानंतर त्यांचे जीवन अत्यंत हलाखीचे बनते. तिच्यावर बलात्कार होतो. अनेकवेळा तर तिला वेश्याव्यवसायात ढकलले जाते.

सिंधमध्ये कट्टरतावाद डोके वर काढू लागला असतानाच हा अहवाल आला आहे. हा भाग पाकिस्तानात तुलनेने शांत मानला जातो. येथे सूफींचा जबरदस्त प्रभाव राहीला आहे. या भागात शतकांपासून हिंदू-मुस्लिम एकत्र राहीले आहेत. आता तेथे मुस्लिम कट्टरतावाद उफाळून आला आहे. पाकच्या राष्ट्रीय संसदेत अनेक हिंदू खासदार आहेत. प्रत्येक प्रांतिक असेंबली आणि सिनेटमध्ये देखील हिंदू खासदार आहेत. हे खासदार आता पाक सरकारकडे जबरदस्ती धर्म परिवर्तन करविण्याविरूद्ध अध्यादेश आणण्यासाठी पाठपूरावा करत आहेत. या गुह्यासाठी दंडाची तरतूद करण्याचीही त्यांची मागणी आहे. पाकमध्ये अल्पसंख्याकांची दुर्दशा  मोठी असफलता आहे.

Leave a Comment