मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी करून टाकलेल्या छाप्यात 5 हजार जणांना अटक केली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अटक करण्याची ही पहिलीच वेळ असून याकरीता मुंबई पोलिसांनी 216 पथकांची स्थापना केली आहे.अटक केलेल्यांमध्ये अमलीपदार्थांची तस्करी करणारे, अवैध शस्त्रs बाळगणारे तसेच इतर सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू असल्याने शहरात अनेक नागरिकांची आवक वाढली आहे. बाहेरगावहून आलेले नागरीक हे नेमके कशाकरीता आले आहेत याची माहिती नसल्याने मुंबई पोलिसांनी सजगता बाळगण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी शहरात अमलीपदार्थांची तस्करी करणारे, तसेच शस्त्रांची अवैध म्नार्गाने तस्करी करणाऱयांवर पोलिसांनी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अनेक ठिकाणे ही संवेदनशील असल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याकरीता ही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिली.
त्याचप्रमाणे शहरात विविध ठिकाणी नाकांबदी लावण्यात आली असून, मोठय़ा प्रमाणात कोम्बींग ऑपरेशन सुरू केले आहे. तर 216 पथकांची स्थापना केली असून, त्याअंतर्गत 108 भरारी पथके कार्यरत आहेत. यादरम्यान 3 हजार सराईत गुन्हेगारांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. तर 40 अवैध शस्त्रास्त्रs जप्त करण्यात आली आहेत. तसेच यातील 300 जणांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान 100 जणांना तडीपार करण्यात आले आहे. 140 जणांकडून बॉण्ड लिहिण्यात आला आहे. तर 400 जण फरार घोषित करण्यात आले आहे. अवैधरित्या देशी दारू आणि विदेशी मद्याचा साठा करणाऱया 146 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.