ठाण्यात सेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात हाणामारी

ठाणे  – कोणी काय केले … कोण श्रेय लाटतो ?यावरून प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘सामना’रंगतो,मात्र स्थानिक पातळीवर त्याची मजल थेट हाणामारीपर्यंत  कशी पोहचते याचे उत्तम उदाहरण एका वृत्तवाहिनीच्या निवडणूकविषयक कार्यक्रमात पहावयास मिळाले. ठाण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्येच हाणामारी झाली.  

एका वृत्तवाहिनीच्या ‘महाजनादेश २०१४’ या कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या जाणून घेताना कार्यकर्त्यांनी राडा घातला. ठाणे मतदार संघातील नागरीकांच्या समस्या जाणून घेण्याच्या या कार्यक्रमात सेनेसह भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.  विशेषतः बेकायदा बांधकामाचा प्रश्न  या निवडणुकीत गाजत आहे. तो विषय चर्चेला येताच युतीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. उत्तरे देण्यास बगल देवून कार्यकर्त्यांनी हाणामारीच केली.  गुजरातच्या शालेय पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने छापण्यात आला आहे. यावरुनही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झालेले पहायला मिळाले. 

 

Leave a Comment