आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी श्रीनिवासनची होणार चौकशी

नवी दिल्ली – आयपीएलमधील गैरव्यवहारप्रकरणामुळे बीसीसीआयचे पदच्युत अध्यक्ष एन. श्रीनिवासन अडचणीत सापडले आहेत. अध्यक्षपदावरून हकालपटी केल्यानंतर श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. त्यांपची आता आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारण्याचा अर्जही आता फेटाळून लावला आहे. जोपर्यंत आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणातील सर्व आरोपांतून त्यांना क्लीनचीट मिळत नाही तोपर्यंत श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळू शकणार नाही, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात त्यांची चौकशी होणार आहे.

आगामी काळात बीसीसीआयची स्वायत्ता अबाधीत राखण्यासाठी श्रीनिवासन यांच्यासह १३ जणांची चौकशी करताना ती बीसीसीआयद्वारे स्थापन केलेल्या समितीद्वारेच करण्यात यावी, अशा प्रकारचे आदेश आता सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यािमुळे श्रीनिवासन यांच्यासह १३ जणांच्या चौकशीत काय निष्पपन्न होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment