वॉशिंग्टन – अमेरिकेत गेल्या तीन वर्षांत एक तृतीयांश भारतीय कामगारांची नोंद हंगामी म्हणून झाली आहे. हा आकडा 1.87 दशलक्षांइतका असून अनिवासी वर्गांत हे कामगार समाविष्ट आहेत. अमेरिकेत निवासी भारतीय कामगारांची संख्या 4 लाख 30 हजार इतकी आहे. दरम्यान, यात विद्यार्थ्यांचाही समावेश असून विद्यार्थ्याच्या आकडेवारीत चीननंतर भारताचा क्रमांक लागल्याचे चित्र समोर आले आहे.
अमेरिकेतील डीपार्टमेंट ऑफ होमलँड या शासकीय संस्थेने हा ताजा अहवाल जाहीर केला आहे. त्यात 2012 मध्ये अमेरीकेत 1.87 दशलक्ष अनिवासी भारतीय कामगार हंगामी म्हणून कार्यरत आहेत. तर 4 लाख 30 हजार भारतीय कामगार निवासी गटात समाविष्ट आहेत. यात चीन 2 लाख 10 हजार आणि दक्षिण कोरीया 1 लाख, 40 हजार निवासी कामगार यांचा क्रमांक लागतो.
अमेरिकेतील अनिवासी लोकांच्या 2012 च्या आकडेवारीत हंगामी कामगारांत भारत 45 टक्के अर्थात 8 लाख 40 हजार तर 38 टक्के विद्यार्थी भारतीय असून ही संख्या 7 लाख 20 हजारांइतकी आहे. अर्थात 38 टक्के हंगामी कामगार हे भारतीय असून त्यातील 45 टक्के वर्ग हा 25 ते 34 या वयोगटातील आहे. अनिवासी विद्यार्थ्यांत चीनमधील 22 टक्के, भारतीय 14 टक्के आणि दक्षिण कोरीया 13 टक्के यांचा समावेश आहे. यातही 18 ते 24 या वयोगटातील विद्यार्थी अधिक असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
बदली प्रवासी अर्थात एक्सेंज व्हिजीटर अंतर्गत 12 टक्के निवासी, अनिवासींची नोंद असून त्यात 4 टक्के दुतावास आणि प्रतिनिधींचा समावेश आहे. विद्यार्थी आणि बदली प्रवासी अतर्गत कृतीशील गटात विद्यार्थ्याची नोंद होते, यासाठी डीएचएस आणि एक्सेंज व्हिजीटर इंफाँर्मेंशन सिस्टीम सेव्हीस कार्यरत असून तिचाही अहवाल यात विचारात घेण्यात आलेला आहे.
होमलँड सिक्युरिटीच्या या अहवालात भारतासह आशियायी देशांतील निवासी, अनिवासी लोकांची संख्या 9 लाख 80 हजार इतकी आहे. यातही भारत 23 टक्के, चीन 11 टक्के, दक्षीण कोरीया 8 टक्के आणि जपान 5 टक्के यांचा समावेश आहे. याशिवाय युरोप आणि उत्तर अमेरिपेची तुलना करता त्यात 26 टक्क्यांनी भर पडते पण यात पॅनडा सहा टक्के आणि मेक्सिको 5 टक्के यांचा समावेश होतो.
हंगामी कामगारात सर्वाधीक अनिवासींची संख्या ही मेक्सिकोतील 78 टक्के असून त्यानंतर भारतीय 74 टक्के, पॅनडा 67 टक्के, युनायटेड किंगडम 65 टक्के यांचा क्रमांक लागतो आणि अन्य देशांतील वाटा हा 45 टक्क्यांइतका आहे. अनिवासी विद्यार्थ्यांत सौदी अरेबिया, चीन आणि कोरीयाकडून व्हिसाची अधिक मागणी होते.यात 90 टक्के सौदी विद्यार्थी असून त्यानंतर 73 टक्के चीन आणि 67 टक्के दक्षिण कोरीयाचे विद्यार्थी आहेत, असेही अहवालात नमूद केले आहे. दहा महासत्ता असलेल्या देशांतील नागरीकत्वांत एक्सेंज व्हिजीटस अंतर्गत जर्मनी आणि फ्रान्स यांचा वाटा 60 टक्क्यांचा आहे.
दरम्यान, सवार्धिक हंगामी कामगारांचा रहीवास असल्याची नोंद टेक्सास, न्यु जर्सी आणि वॉशिंग्टनमध्यें झालेली आहे. तर मॅच्युसेटस आणि पेनसिल्व्हानियात विद्यार्थ्याची संख्या अधिक आहे. पण 2012 मध्ये अमेरीकेतील हंगामी कामगारात 8 लाख 40 हजार भारतीयांचा समावेश असून ही टक्केवारी 45 टक्क्यांइतकी आहे तर भारतीय विद्यार्थ्याची संख्या 7 लाख 20 हजारांइतकी असून ही टक्केवारी 38 टक्क्यांइतकी आहे, असे अहवालात नमूद केले आहे.