४५० अमिताभ बच्चन आणि ७ हजार गब्बरसिंग करणार मतदान

voter'slist

देशात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरू असताना निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मतदारयाद्यांत मनोरंजक माहितीही समोर येते आहे. अनेक प्रसिद्ध नावांशी मिळतीजुळती हजारो नांवे मतदार यादीत आहेत आणि प्रत्यक्षात कांही ठिकाणी या मतदारांनी मतदान केले आहे तर कांही ठिकाणी ते केले जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या विविध राज्यातील मतदारयाद्यात ४५० अमिताभ बच्चन, २ सुरमा भोपाली, ७ हजारांहून अधिक गब्बरसिंग, ५ हजार रोबो तर १ मिस्टर इंडिया या नावाचा मतदार आहे. ४५० अमिताभ बच्चनमधील बहुसंख्य मतदार हे २० ते ३० वयोगटातील आहेत. शोले या लोकप्रिय सिनेमातील अनेक पात्रांची नांवे देशाच्या २८ राज्यापैकी २४ राज्यातील मतदार यांद्यात नोंदविली गेली आहेत.आणि हे मतदार संबंधित राज्यातूनच मतदान करणार आहेत.

या मतदारांत ७०४० गब्बरसिंग असून त्यातील ४५ गब्बरसिगांच्या वडिलांचे नांवही हरिसिंग असेच आहे. जय, वीरू, बसंती या नावाचे तर हजारो मतदार आहेत. ५ हजार मतदार रोबो नावाने आहेत तर १६० अँथनी गोन्साल्व्हिस, ३० शाहरूख खान, शिवाय आमीरखान, हृतिक, या नावाच्या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे.

Leave a Comment