स्टीलपेक्षा मजबूत काच प्रत्यक्षात

काच हाताळायची म्हणजे नाजूक हातांचेच ते काम. थोडीशी घाईगर्दी झाली तर काचेची वस्तू फुटणार आणि काचांचे तुकडे गोळा करता करता नाकी नऊ येणार हा आपला नेहमीचा अनुभव. मात्र येल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी स्टील म्हणजे पोलादापेक्षा मजबूत काच बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले असून ही काच लवकरच प्रत्यक्ष वापरात आणली जाईल. बल्क मेटालिक ग्लास असे तिचे नामकरण केले गेले आहे.

परंपरागत पद्धतीने काच बनविताना मूळ धातू आणि मिश्र धातूची संयुगे ओळखण्यास १ दिवसाचा कालावधी लागतो. मटेरियल सायन्सने प्रो. अभियंते जेन स्क्रोअर्स यांनी विकसित केलेल्या पद्धतीनुसार मात्र रोज अशा प्रकारची ३ हजार संयुगे तपासता येतात आणि त्यात त्यांची प्रसरणशीलतेची क्षमताही कळू शकते. या प्रकारे बनविलेली काच आत्तापर्यंत घड्याळयांसारख्या उपकरणातच वापरली जात होती मात्र आता त्याची निर्मिती नवीन तंत्रज्ञानानुसार कमी वेळात, कमी खर्चात होऊ शकणार असल्याने त्याचा वापर बायोमेडिकल स्टेन्टस, इन्प्लांट मटेरियल, मोबाईल व अन्य इलेक्ट्रोनिक्स वस्तूंसाठीही करता येणार आहे.

Leave a Comment