
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा या हंगामातील कर्णधार विराट कोहलीचे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी डेटिंग सुरु असल्याची बाब सर्वश्रुत आहे. अर्थात, बुधवारी आयपीएल गाला डिनरदरम्यान दस्तुरखुद्द विराट कोहलीनेच त्याची जाहीर कबुली दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहिल्या नाहीत.बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपल्या कल्पकतेची प्रचीती देत बनावट स्वयंवर सोहळय़ात विराटला त्याच्या लेडी लव्हची ओळख करुन देण्यास सांगितले. विराटला त्याने काही पर्यायही दिले होते. अर्थातच, विराटने अनुष्काच्या नावाला पसंती दिली!
