फेसबुकचे नवे मेसेंजर अ‍ॅप

न्यूयॉर्क – मोबाइल अ‍ॅप्स वापरणार्‍या सर्वांना चॅटिंग करण्यासाठी फेसबुक एक वेगळे नवे मेसेंजर अ‍ॅप सादर करणार आहे. हे अ‍ॅप सर्व ग्राहकांना आवडेल अशी ग्वाही फेसबुकच्या वतीने देण्यात आली आहे.  जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ असलेले फेसबुक पुढील दोन आठवड्यांमध्ये आपली चॅटिंगची सुविधा स्मार्टफोन अ‍ॅपमधून काढून टाकणार आहे.

ज्यांना फेसबुकवरून अशाच पद्धतीने संदेश पाठवायचे किंवा स्वीकारायचे असतील त्यांना फेसबुकचे नवे मेसेंजर अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. हा बदल सुरुवातीला ब्रिटन, फ्रान्स आणि स्कँडिनेव्हियन देशांमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, अमेरिकेसह उर्वरित जगभरात त्यानंतर ही सुविधा देण्यात येणार आहे. अ‍ॅपल आणि अँड्रॉइड वापरणारे लोक ही सुविधा वापरू शकतील.

Leave a Comment