धोनी करणार आयपीएलच्या सामन्याचे शतक

मुंबई: आयपीएलच्या सामन्यात आतापर्यंत कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आगळेवेगळे विक्रम केले आहेत. असाच एक आगळा वेगळा विक्रम चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी केला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्त्व करताना महेंद्रसिंग धोनी आता चार सामने खेळल्यातनंतर सामन्याचे शतक करणार आहे. आतापर्यंत त्यांने ९६ सामने खेळले आहेत.

सहा वर्षात ९६ सामने खेळणा-या धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्जनी आतापर्यंत ५८ सामन्यात विजय मिळवला आहे आणि ३७ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे, तर एक सामना अनिर्णीत राहिला. आतपर्यंत चेन्नईने दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. गेल्यावर्षी त्यांना अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्कारावा लागला होता.

धोनीनंतर सर्वात जास्त सामने खेळणारा कर्णधार म्हणून अॅडम गिलख्रिस्टचा नंबर येतो. गिलख्रिस्टने डेक्कन चार्जर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी ७४ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. त्याने ३५ सामन्यांमध्ये विजय आणि ३९ सामन्यांमध्ये पराभव पत्करलेला आहे.यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर आहे. गंभीरने आतापर्यंत ६३ सामन्यांमध्ये नेतृत्त्व केलं आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली ३६ सामने जिंकता आले असून २८ सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Leave a Comment