दिल्लीचा कर्णधार पीटरसन जखमी

अबुधाबी- आयपीएलमध्ये गुरुवारी रॉयल चॅलेजर्स बंगळुरु व दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामना रंगणार आहे. सराव करीत असताना जखमी झाल्याने आयपीएलमधील हा पहिलाच सामना दिल्लीचा कर्णधार केव्हिन पीटरसन खेळू शकणार नाही. या पहिल्याच सामन्यात त्यांना बंगळुरुचे कडवे आव्हान असणार आहे.

सराव करीत असताना कर्णधार पीटरसन जखमी झाल्यापने त्याीला बेंगलोरविरुध्दाचा सामना खेळता येणार नाही; पहिल्याच सामन्यात कर्णधार पीटरसन नसल्याने त्यांाना काहीसे कठीण जाणार असले तरी त्यांच्याकडेही एकापेक्षा एक दमदार खेळाडू आहेत. दिनेश कार्तिक, मुरली विजय, क्विंटन डि कॉक, रॉस टेलरसारखे फलंदाज संघाच्या दिमतीला आहेत. पण संघाची गोलंदाजी मात्र अनुनभवी वाटत आहे. त्यातमुळे या पहिल्यास समान्याआत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आयपीएलमध्ये पहिल्यादाच बंगळुरुचा संघ यंदाच्या पर्वात अधिक बलवान दिसत आहे. या संघात कर्णधार कोहलीबरोबर ख्रिस गेल आणि ए बी डी’व्हिलियर्ससारखे तडाखेबंद फलंदाज आहेत, तर यंदाच्या मोसमात युवराज सिंग ही त्यांच्या ताफ्यात आल्याने संघाची फलंदाजी अधिक बळकट होईल, तर मॉर्केलसारखा दणकेबाज अष्टपैलू त्यांच्याकडे असेल. गोलंदाजीमध्ये मुथ्यय्या मुरलीधरन, रवी रामपॉल, मिचेल स्टार्क आणि वरुण आरोनसारखी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाजांची फळी संघाकडे आहे.

Leave a Comment