कलमाडी म्हणतात ,अशोक चव्हाण नशीबवान !

पुणे – यंदा पुण्याच्या लोकसभा मतदार संघात माजी खासदार आणि एकेकाळचे सबसे बडा खिलाडी असणाऱ्या सुरेश कलमाडी यांना स्वताला नव्हे ,तर अन्य उमेदवाराला मतदान करण्याचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रात यावे लागले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण नशीबवान ठरले अशी प्रतिक्रिया दिली पण चव्हाण  यांचा राजकीय वनवास संपला; मात्र माझा अजून  नाही हेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. 

पुणे मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने सुरेश कलमाडी नाराज झाले असले तरी  आज कलमाडी यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.घोटाळ्यांच्या आरोपामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी या दोघांचीही राजकीय कारकिर्द  धोक्यात आली असताना या निवडणुकीच्या माध्यामातून अशोक चव्हाण यांना एक संधी देण्यात आली  आहे. मात्र, कलमाडी यांच्यावर हायकमांडने अजून कृपादृष्टी दाखविलेली नाही. राष्ट्रकुल घोटाळ्यात कलमाडी अडकले ,त्यांची राजकीय कारकीर्दही धोक्यात आली.

पुण्यातून पुन्हा उमेदवारी बाळगून असताना त्यांचा पत्ता हायकमांडने कापला आणि ‘आरजी ‘च्या वर्तुळात असलेल्या  विश्वजित कदम यांना उमेदवारी मिळाली पण ‘एका दगडात… ‘च्या धर्तीवर कॉंग्रेसच्या हायकमांडने कलमाडी यांना टिपताना त्यांच्या समर्थकांचीही कोंडी केली आहे. तर आदर्श घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेले अशोक चव्हाण यांना काँग्रेसने तिकीट दिल्याने त्यांचा राजकीय वनवास जवळपास संपुष्टात आला मात्र  कॉमनवेल्थ घोटाळ्यात कलमाडींचे नाव आले तरी  काँग्रेसने कलमाडींना सोडले नाही पण, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने कलमाडीं डावलले.

कलमाडींना लोकसभेचे तिकिट दिले नाही. त्याऐवजी विश्वजीत कदम या नवख्या तरुणाला पुण्यातून उमेदवारी दिली या पार्श्वभूमीवर कलमाडी यांनी अशोक चव्हाण हे नशीबवान ठरले अशी प्रतिक्रिया देताना त्यांचा  राजकीय वनवास संपुष्टात आला मात्र आपला अजून नाही आणि तो कधीं याचीच प्रतीक्षा असल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष सुचित केले.  

 

Leave a Comment