मतांचे ‘मोल’ नाकारल्याने झोडपले

बीड –  मतांचे ‘मोल’ घेण्यास नकार देणाऱ्या मतदारांना पैसेवाटप करणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झोडपल्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गहुखेल गावात घडली.काँग्रेस उमेदवाराच्या कार्यकर्त्याकडून ही मारहाण करण्यात आल्याचे समजते. यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील गहुखेल गावात काल रात्री हा प्रकार घडला. बीड लोकसभा मतदार संघातून भाजप नेते गोपीनाथ मुंडे निवडणुक लढवत आहे. त्यांच्या  विरोधात काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याठिकाणी काही लोकांकडून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटप करण्यात  येत होते. मात्र त्यात पैसे नाकारणाऱ्या चौघांना पैसे वाटप करणाऱ्यांनी बेदम मारहाण केली. अंभोरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.  सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडुन  मारहाण झाल्याची फिर्यादींनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

Leave a Comment