कोंड्यावरची घरगुती उपाय

केसात होणारा कोंडा हा तशी सामान्य समस्या वाटते, मात्र तिचे दुष्परिणाम ङ्गार असतात. काही वेळा कोंड्याचे परिणाम डोळ्यावरही होतात आणि तारुण्यात पदार्पण करणार्‍या मुला-मुलींमध्ये तारुण्य पीटिकांचा त्रासही कोंड्यामुळेच होत असतो. केसातला कोंडा कमी होण्यासाठी दोन प्रकारचे उपाय आहेत. पहिला उपाय वरवरचा आहे आणि दुसरा मूलगामी आहे. बाजारा मध्ये केसातल्या कोंड्यावर उपाय म्हणून अनेक प्रकारची तेले आणि शाम्पूज् मिळतात. परंतु त्यांचा कोंड्यावर इलाज होतोच असे नाही. म्हणून तज्ज्ञांनी कोंडा कमी करण्या साठी काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय अगदीच सामान्य आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तू, साधने आणि वनस्पतींच्या साह्याने योजिले जाऊ शकतात. साधारणत: मेथीचे दाणे, लिंबू, हरभर्‍याच्या दाळीचे पीठ अशा वस्तू कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. रोजच्या रोज डोक्याला नियमितपणे मालीश करणे कोंडा कमी करण्यासाठी आवश्यक असते. मात्र असे मालीश करताना त्यात काही विशिष्ट प्रकारची औषधे किंवा वनस्पती घालायला सांगितले जाते.

उत्तम तयार झालेले दही तीन दिवस उघड्यावर उन्हात ठेवून नंतर ते दही अर्ध्या तासासाठी डोक्याला लावल्यास कोंडा कमी होतो. लिंबाचा रस आणि अल्मा ज्यूस यांचे मिश्रण करून रात्री झोपताना डोक्याला चोळल्यास कोंडा कमी होतो. सङ्गरचंदापासून तयार केले जाणारे व्हिनेगार जे बाजारात सायडर व्हिनेगार म्हणून उपलब्ध असते ते घेऊन त्याच्यात समान पाणी मिसळून त्याला सौम्य करावे आणि कापसाच्या बोळ्याने ते केसांच्या मुळाशी थापावे. शाम्पूने केस धुण्याच्या आधी हा उपचार करावा. तो कोंडा कमी होण्यास उपयुक्त ठरतो. अशा प्रकारचे काही घरगुती उपाय सांगितले जात असतात. मात्र केस विंचरण्याच्या काही विशिष्ट पद्धतीने सुद्धा कोंडा कमी होऊ शकतो. केस विंचरताना मागून पुढे असे विंचरावेत. त्यासाठी कमरेतून वाकावे लागेल आणि तसे केस विंचरावे लागतील.

या सगळ्या वरवरच्या उपाययोजना आहेत. मुळात आपल्या खाण्या-पिण्याचा कोंडा होण्याशी खूप निकटचा संबंध आहे. चेहरा तेलगट आणि थबथबलेला दिसू नये म्हणून तरुण मुले-मुली डोक्याला तेल लावत नाहीत. त्यामुळेही कोंडा होण्याची शक्यता असते. मात्र केसांच्या सौंदर्यासाठी आणि केसंाचे कोंड्यासारख्या संकटापासून संरक्षण होण्यासाठी भरपूर हिरव्या पालेभाज्या खाणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. हा उपाय केवळ कोंड्यालाच नव्हे तर इतरही अनेक विकारांना उपयुक्त ठरतो. त्याशिवाय कोंडा होऊ नये म्हणून शिळे अन्न टाळले पाहिजे. बाजारात उपलब्ध असलेले बंद डब्यातले खाद्यपदार्थ आणि पेये वापरण्याचे टाळले पाहिजे. अधिक मसालेदार पदार्थ खाऊ नये आणि वारंवार कडक चहा आणि कॉङ्गी पिण्याचे टाळावे.