राहुलच्या सभेला तुरळक गर्दी

पुणे – पुण्यातील काँग्रसचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांची सभा पुण्यात झाल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. कारण या सभेत राहुल गांधी यांची विरोधकांवर फक्त टीका न करता काँग्रेसचा पुढचा अजेंडाही सांगितला, पुढची दिशाही स्पष्ट करून भाषण संतुलित केले. त्यामुळेच ते लोकांना भावले असणार. सभा दुपारच्या भर उन्हात होती. तरीह राहुल गांधी यांचे प्रभाव पाडणारे भाषण झाले पण त्याच बरोबर सभेला हाऊस फुल्ल गर्दी असती तर ते अधिक प्रभावशाली वाटले असते अन त्यामुळे निवडणुकीत जान आली असती.

भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेमुळे महायुतीत चांगलेच उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता त्याला प्रतिशह देण्यासाठी राहुल गांधी यांची सभा होणार का ? झाली तर कशी होणार याबद्दल मतदारांच्यात उत्सुकता होती. कारण या अगोदर राहुल गांधी यांची सभा किंवा रोड शो 9 एप्रिल नंतर सभा 13 एप्रिल होणार अशा तारखाचा फक्त ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे ते येणार का नाही अशीही शंका घेण्यास सुरूवात झाली होती.

पुण्यातील विश्वजीत कदम आणि हिंगोलीचे राजीव सातव हे महाराष्ट्र प्रदेश आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असल्यानेच त्यांच्या उमेदवारीसाठी राहुल गांधी आग्रही होते. अपेक्षेप्रमाणे दोघांना उमेदवारी मिळाली. आता हे दोन्ही उमेदवार थेट राहुल गांधी यांचेच असल्याने त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी येणार अशीच कार्यकर्त्यांची अटकळ आज खरी ठरली.

आजच्या पुण्यातील सभेत राहुल गांधी यांनी पुणे हे केवळ शहर नसून ही एक विचारधार आहे असे सांगत भाषणाच्या सुरूवातीलाच शिवाजी महाराजांपासून ते टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी यांची नावे घेत सभेचा ताबा घेतला. त्यानंतर मोदी आणि भाजपवर टीका केली. तसेच भाजपची विचारधारा नथूराम गोडसेची विचारधार असून ही निवडणूक प्रेमाने जोडणा-या आणि व्देषाने तोडणा-या अशा दोन विचारधारांमधील निवडणूक असल्याचे सांगितले.

गुजरातच्या विकासाच्या दाव्यांचाही आकडेवारी देत समाचार घेतला. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात कशी काँग्रेसचीच धोऱणे घेतली आहेत हे दाखवून दिले. त्यांचे हे सगळेच मुद्दे कोणालाही भाषण ऐकणा-यांना सहजपणे पटणारे होते.पण त्यांनी केवळ टीकच न करता या पुणे शहरासाठी भविष्यात काय योजना आहेत ? तसेच देशातील काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर पुढे काय कार्यक्रम राबवणार हेसांगितल्याने ऐकणा-यांना विश्वास वाटेल असेच ते वाटले.

 

Leave a Comment