
क्वालांलपूर – मलेशियन एअरलाइन्सचे बेपत्ता असलेले विमान MH370 बाबत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पाकिस्तान- अफगणिस्तानाच्या सीमावर्ती भागात असलेल्या कंधारमध्ये गेल्या एक महिन्यांपासून बेपत्ता असलेले MH370 उतरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे विमान तालिबानींनी हायजॅक केल्याचा दावा रशियातील एका वृत्तपत्राने केला आहे. ‘द मॉस्कोवस्काई कोम्सोमोलेट्स’ या वृत्तपत्राने गुप्तचर विभागाच्या एका सूत्राच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
