टाकावू क्ष किरण यंत्रांचा धोका

केरळ हे भारतातले सर्वात प्रगत  राज्य मानले जाते. त्यातल्या त्यात वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत हे खरे आहे. पण आता या राज्यातील वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात एक मोठा धोका निर्माण झाला आहे. राज्यातल्या सर्व खाजगी रुग्णालयांत वापरली जाणारी क्ष किरण यंत्रे आणि सीटी स्कॅनिंग यंत्रे धोकादायक असल्याचे आढळले आहे.  अमेरिका आणि यूरोपातल्या काही देशांनी या प्रकारच्या कालबाह्य झालेल्या यंत्रणा  केरळातले डॉक्टर कमी किंमतीला खरेदी करून आणत आहेत. ही यंत्रे तिकडे आता वापरात आणायला बंदी आहे कारण वाहनांप्रमाणेच अशा यंत्रांच्या वापराचीही एक मुदत असते. ती संपली तरी काही वेळा ही यंत्रे चांगले काम करीत आहेत असे दिसते  पण त्यांच्यात काही दोष निर्माण झालेले असतात. म्हणून वरकरणी ती यंत्रे चालू दिसत असली तरीही ती निकामी असतात. 

अशा यंत्रांच्या ङ्गेरवापरात काही धोके असतात. त्यांतून अधिक किरणोत्सर्जन होऊ शकते. म्हणूनच त्या देशांत अशी यंत्रे  बाद केली जात असतात.ती तिथे टाकून दिली असली तरीही तिथले सरकार ती यंत्रे निकामी करीत नाही. या सेकंड हँड यंत्रे भारतासारख्या देशात विकण्याची परवानगी देते. या देशातले लोक भारतासारख्या देशातल्या माणसाला माणूश मानत नाहीत. त्यांना काही इजा झाली तरी त्यांना चालते. आपल्या देशात मात्र ही सरकारे अशी यंत्रे बाद करण्याबाबत कटाक्षाने लक्ष देत असतात. मात्र भारतातलेही काही डॉक्टर पैशाच्या लोभांपायी ही कमी किंमतीची यंत्रे खरेदी करतात आणि त्यांचा सर्रास वापर करतात. त्यामुळे खालील धोके संभवतात. या यंत्रांचा वापर करून ङ्गोटो काढताना किंवा होल बॉडी स्कॅनिंग करताना रुग्णावर मर्यादेपेक्षा अधिक किरणे पडतात. ती ज्या भागावर पडतात तो भाग सुजतो आणि त्या भागावर ङ्गोड येतात. तो ङ्गोड दुरूस्त होत नाहीत. त्यामुळे सार अवयव बाधित होतो. त्या जागेवरची  त्वचा काढून त्या जागेवर पर्यायी त्वचा तरी बसवावी लागते किंवा तो अवयवच कापून काढावा लागतो.  

काही लोकांत या जादा किरणोत्सर्जना मुळे वंध्यत्व येण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे किरणो त्सर्जन गरोदर महिलांच्या बाबतीत झाले तर तिच्या गर्भावर गंभीर परिणाम होतो. जन्माला येणारे बाळ काही जन्मजात वैगुण्य घेऊन जन्माला येते. असे वैगुण्य दुरुस्त होण्यासारखे नसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या किरणोत्सर्जना मुळे कर्करोग बळावण्याची शक्यता असते. हे सारे माहीत असूनही काही डॉक्टर्स, निष्काळजीपणाने अशी धोकादायक यंत्रे आयात करीत आहेत. डॉक्टरांच्या संघटनेने या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवला आहे आणि अणु संशोधन केन्द्राकडे याचा अहवाल पाठविला आहे. क्ष किरण यंत्रात काही ट्यूब्ज पाच वर्षेच वापरल्या जाव्यात असे निर्बंध आहेत पण त्या टयूब्ज मारतात आयात केल्या जात आहेत.

Leave a Comment