आता ‘आप’ म्हणते ,कसले उपोषण आणि आंदोलन !

सांगली – आंदोलने ,उपोषण करताना सर्वसामान्य नागरिकांना साद घालून ‘आम आदमी’ या पक्षाचा जन्म घालणाऱ्या आपच्या नेत्यांनी आता कसले आंदोलन आणि कसले उपोषण असा पवित्रा घेतला आहे. आंदोलनातून आम आदमीची सहानभूती मिळवणाऱ्या ‘आप’च्या कारभार्यांनी दिल्लीत ४९ दिवसांची सत्ता भोगली पण दिलेले आश्वासन कसे अंमलात आणायचे या पेचात अडकलेल्या आपने सर्व खापर राजकीय पक्षावर विशेषतः सत्ताधार्यांवर फोडले.ही पार्श्वभूमी असणारी आम आदमी पार्टी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा जनतेला साद घालत आहे. 

मात्र त्यांना आता पूर्वीच्या भूमिकेचा सोयीस्कर ‘विसर ‘पडत आहे. याचा प्रत्यय सांगलीतील प्रचारात आला. सांगलीत आपच्या उमेदवार समीना खान यांच्या प्रचारार्थ आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया आल्या होत्या. त्यांनी यापुढे आंदोलन आणि उपोषणाचा देशात उपयोग होणार नसल्याचे वक्तव्य केले . लोकांच्या पैशातूनच निवडणुका झाल्या पाहिजेत. तरच लोकप्रतिनिधींना काळा पैसा आणि नागरिकांच्या समस्येबद्दल जाब विचारता येईल असेही दमानिया म्हणाल्या.