मुंबई : निवडणूक आयोग जर त्यांवचे काम चोखपणे बजावत असेल तर त्यांचा कारभारावर टीका करण्याकचा कोणालाच अधिकार नाही. केवळ मर्यादेपेक्षा जास्तर पैसा प्रचारासाठी खर्च करता येत नसल्याचने राष्ट्रीवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्यच करीत टीका केली आहे. पवार यांचे हे मत चुकीचे असल्यांचे मत रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांनी भरसभेत दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या धाडींवर टीका केली होती. त्यांनी केलेल्या या टीकेचा समाचार आठवलेंनी घेतला आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादापेक्षा जास्त पैसा प्रचारासाठी वापरला आणि तो पकडला गेला तर त्यात चुकीचे काय असा सवाल रामदास आठवलेंनी केला आहे.
त्यासोबतच येत्याल काळात इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक लवकर तयार व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आठवले यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयती निमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.