सचिन, गांगूली, सलमान उतरले फुटबॉलच्या मैदानात

कोलकाता : आगामी काळात भारतात फुटबॉल खेळाडूंना चालना मिळावी या उदेशाने ‘इंडियन सुपर लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यारत आले आहे. या स्पर्धेसाठी क्रिेकेटपटू सचिन तेंडूलकर, सौरव गांगूली, अभिनेता सलमान खान, रणबीर कपूर, जॉन अब्राहम या सर्व दिग्गजांनी फ्रँचायझी हक्क मिळवले आहेत. ‘इंडियन सुपर लीग’ सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होत आहे. इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेच्या आठ संघांची आणि मालकांची घोषणा रविवारी करण्यात आली.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या मान्यतेने आयएमजी-रिलायन्स आणि स्टार इंडियाच्या सहकार्याने आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील दिग्गज फुटबॉलपटूंचा समावेश असणार आहे. टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हे फुलबॉलच्या मैदानात भिडणार आहेत. तेंडुलकर-गांगुलीच नाही, तर अभिनेते सलमान खान, जॉन अब्राहम, रणबीर कपूर यांनीही फुटबॉलच्या मैदानात उडी घेतली आहे.

त्यासोबतच गांगुलीने स्पॅनिश लीगमध्ये अग्रस्थानी असणा-या अॅबटलेटिको माद्रिद तसेच व्यावसायिक हर्षवर्धन नेओटिया, संजीव गोएंका आणि उत्सव पारेख यांनी मिळून कोलकाता फ्रँचायझी मिळवली आहे.बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि व्यवसायाने सनदी लेखापाल असलेल्या बिमल पारेख यांनी मुंबई संघाचे हक्क मिळवले आहेत.सलमान खान तसेच वाधवान समूहाचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी पुणे संघाचे हक्क प्राप्त केले आहेत.तर अभिनेता जॉन अब्राहमने शिलाँग लजाँग या आय-लीगमधील संघासह गुवाहाटी संघाचे फ्रँचायझी हक्क मिळवले आहेत.

Leave a Comment