राज्यातून केवळ १८ महिला अजमवाताहेत नशीब

पुणे- सर्वच राजकीय पक्षांकडून ३३ टक्के महिला आरक्षणला पाठिंबा दर्शविला जात असला तरी लोकसभा निवडणूकीत मात्र, या प्रमुख पक्षांकडून कमी प्रमाणात महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातून केवळ १८ महिला निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. भाजप, राष्ट्रवादी काग्रेंसने प्रत्येकी तीन तर काग्रेस व शिवसेनेनी प्रत्येकी एक तर बसपाने दोन आणि नव्यााने निवडणूक लढवित असलेल्या आम पार्टीने ८ महिलांना उमेदवारी दिली आहे. मराठवाडयातील यावेळेसची लोकसभा निवडणूक प्रमुख पक्षांच्याी महिला उमेदावाराविना होत आहे.

स्थाानिक स्वराज्य संस्थेाच्या निवडणूकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण दिल्याने राजकारणात मोठया प्रमाणात महिलांचा सहभाग दिसून येत आहे. त्या‍मुळे यावेळेसच्या लोकसभा निवडणूकीत महिलांला मोठया प्रमाणात संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी या अपेक्षेवर पाणी पिफरवले आहे. त्यामुळे सर्वच प्रमुखराजकीय पक्षांकडून ३३ टक्के आरक्षणाचा केवळ डंकाच मिरवला जातो असे दिसते.

मराठवाडयातील यावेळेसची लोकसभा निवडणूक प्रमुख पक्षांच्याद महिला उमेदावाराविना होत आहे. केवळ जालना मतदारसंघातून नवख्याक असलेल्याम आम आदमी पक्षाच्याहवतीने सलमा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्याात आली आहे. २००९ सालच्याद निवडणूकीत माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादीकडून हिंगोली मतदारसंघातून निवडणूक रिंगणत होत्याव. त्याी त्यारवेळी पराभूत झाल्यार होत्याू. तर २००४ साली मराठवाडयातील आठ मतदारसंघातून पहिल्यां दाच तीन महिला खासदार निवडून आल्याा होत्या . हिंगोलीतून राष्ट्रावादीच्यां सूर्यकांता पाटील, उस्माननाबादमधून शिवसेनेच्या कल्पयना नरहिरे, लातूरमधून भाजपच्यार रूपाताई पाटील-निलंगेकर या निवडून आल्या‍ होत्याि. त्या‍मुळे यावेळेसपण महिलांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी हात आखडता घेत अपेक्षाभंग केला आहे.

यावेळेस राज्यारतून इतर ठिकाणाहून भाजपने पूनम महाजन, रक्षा खडसे, डॉ हिना गावीत, राष्ट्रवादीने सुप्रीया सुळे, नवनीत राणा, भारती पवार, काग्रेसने प्रिया दत्त व, शिवसेनेने भावना गवळी, बसपाने किरण पाटकर, पुष्पा भोळे, आप मेधा पाटकर, अंजली दमानीया, मीरा सन्यााल, भावना वासनीक, दीपाली सय़यद, सलमा कुलकणी, समीना खान, सविता शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. मनसेने यावेळेस एकाही महिला उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविले नाही.

२००९ च्या लोकसभा निवडणूकीत प्रमख पक्षाकडून सहा महिला मैदानात होत्याह: त्यारपैकी सुप्रिया सुळे, प्रिया दत्ति, भावना गवळी यांना विजय मिळविता आला होता. त्यामुळे यावेळेस आता १८ पैकी कोणत्या माहिलांना निवडणूकीत विजयश्री खेचून आणता येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment