डोपिंगमध्ये सापडल्याने आसफा पॉवेलवर बंदी

किंग्सटन – जमैका डोपिंगविरोधी शिस्तपालन समितीने विश्व विक्रमी धावपटू आसफा पॉवेल डोपिंगमध्ये सापडल्याने त्याच्यावर १८ महिन्यांची बंदी घालण्याची कारवाई केली. गतवर्षीच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आसफा पॉवेल उत्तेजक सेवनात दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यारवर शिस्तपालन समितीने ही कारवाई केली आहे.

जमैका डोपिंगविरोधी शिस्तपालन समितीने केलेल्याे या बंदीचा कालावधी २१ जून २०१३ ते डिसेंबर २०१४ पर्यंत असणार असून या काळात त्याीला कुठल्याबच स्पार्धेत सहभागी होता येणार नाही. पॉवेल यांनी गतवर्षी २१ जून रोजी तपासणीसाठी आपले रक्ताचे नमुने दिले होते. या चाचणीत त्याने स्टीमुलेंट ऑक्सिलोफ्राइन हे उत्तेजक सेवन केल्याचे सिद्ध झाले होते. त्या मुळे त्याच्यावरही कारवाई करण्यायत आली आहे.

दोन दिवस आधी त्याचा माजी ट्रेनिंग पार्टनर शेरोन सिम्पसनही याच उत्तेजन सेवनात दोषी आढळला होता. त्याच्यावरही १८ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. जमैकाचाच ऑलिम्पियन थाळीफेकपटू एलिसन रॅण्डलही मंगळवारी ड्यूरेटिक हार्डड्रो क्लोरोथियाजाइड या उत्तेजक सेवनात दोषी आढळला.

Leave a Comment