आगामी काळात भारत-पाक क्रिकेट मालिकेची शक्याता

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकमधील संबध तणावपुर्ण असल्याणने क्रिकेटचे सामने खेळण्या्वर देखील निर्बंध घालण्याकत आले होते. त्या‍ पार्श्वभूमीवर आता काही दिवसांपूर्वीच दुबईत झालेल्या आयसीसी बैठकीच्या पाश्र्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेसंदर्भातील प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. त्याीमुळे लवकरच भारत-पाक दरम्यान क्रिकेटची मालिका खेळविण्यात येणार आहे.

आागमी काळात होत असलेल्या आयपीएलच्या सामन्याहनंतर किंवा सप्टेंबरमध्ये होणा-या भारताच्या इंग्लंड दौ-यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची एक छोटेखानी मालिका भारत-पाक दरम्याहन आयोजीत केली जाण्या ची शक्यता आहे. यावेळी बोलताना बीसीसीआयचे सचिव संजय पटेल म्हतणाले, आमची पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या पदाधिका-याशी चर्चा झाली असून, येत्या काही दिवसांमध्ये भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट मालिका खेळण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा ९ जुलैपासून सुरू होणार आहे. या महिन्याभराच्या कालखंडात ही एकदिवसीय मालिका होऊ शकते. २०१२मध्ये भारतीय संघ मायदेशात पाकिस्तानसोबत मर्यादित षटकांची छोटेखानी मालिका खेळला होता. या दौ-यासाठी बीसीसीआयला गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Leave a Comment